वर्ल्ड ह्युमन राईट्स प्रोटेक्शनच्यावतीने तिरुपती बालाजी मंदिर समिती अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांना डॉक्टरेट पदवीने सन्मान
करमाळा प्रतिनिधी वर्ल्ड ह्युमन राईट्स प्रोटेक्शन कमीशन नवी दिल्ली यांच्यावतीने कालिंदा फाऊंडेशन पुणे,वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगाव तसेच नियोजित श्री तिरुपती बालाजी मंदिर निर्माण समिती रावगांवचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण नेमचंद बुधवंत यांना सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी प्राप्त होत आहे. याचे वितरण ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथे वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
लक्ष्मण बुधवंत हे आपल्या कालिंदा फाऊंडेशन पुणे तसेच वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. यामध्ये दरवर्षी रावगांव शेजारील वाड्यावस्त्यांच्या शालेय साहित्य वाटप, रुग्णालयात जावून रुग्णांना मदत तसेच फळे वाटप, दिवाळीमध्ये गोरगरिबांना फराळ वाटप, कोरोना काळात रूग्णांना मदत, तसेच रावगांव येथील नियोजित श्री तिरुपती बालाजी मंदिर बांधण्याचे उत्कृष्ट कामकाज ते करत आहेत. तसेच करमाळा तालुक्यातील भक्तांना दर्शनासाठी तिरुपती बालाजी दर्शन यात्रा घडवितात अशा विविध कार्यक्रमाची दखल घेत वर्ल्ड ह्युमन राईट्स प्रोटेक्शन कमीशन नवी दिल्ली यांच्यावतीने ही डाॅक्टरेट पदवी लक्ष्मण बुधवंत यांना मिळत आहे. या निवडीबद्दल त्यांचे करमाळा तालुक्यातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
