गणेश चिवटेंच्या पाठीशी भाजपाची संपूर्ण ताकत उभी करणार :- चेतनसिंह केदार सावंत
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या राजकीय भवितव्यासाठी भाजपा पक्षाची संपूर्ण ताकत उभी करणार असलेचे प्रतिपादन भाजपाचे सोलापूर (प) चे अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.करमाळा तालुक्यातील मौजे मिरगाव्हाण येथील शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,गणेश चिवटे हे हिंदुत्ववादी विचारावर चालणारा कार्यकर्ता असून गेल्या वीस वर्षात भाजपा पक्षाचे काम त्यांनी नेटाने उभे केले आहे. विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम यासोबत दुग्धव्यावसायाच्या माध्यमातून हजरो कुटुंबांना त्यांनी रोजगाराचे साधन दिले आहे.त्यामुळे जनतेच्या मनात त्यांनी विश्वासाचे घर केले असून त्यांनी आता सक्रिय राजकारणात उतरले पाहिजेत अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा गैर नाही.भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपणास ग्वाही देतो की,गणेश चिवटे यांना आपल्यला अपेक्षित असणाऱ्या पदापेक्षाही मोठे पद मिळेल यासाठी पक्षाची संपूर्ण ताकत मी त्यांच्या पाठीशी उभी करेन असेही ते म्हणाले.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार म्हणाले की,गणेश चिवटे यांनी आजवर दुग्धव्यावसायासोबत,विद्यार्थी, निराधार लोकांना जेवणाची सोय करून दिली. सामुदायिक विवाह सोहळ्यातून शाही थाटात अनेकांची लग्न लावून दिली.बांधकाम कामगारांना अनेक योजना मिळवून दिल्या.मल्लासाठी निकाली कुस्त्यांची मैदाने भरवली अशी माहिती दिली.यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन मिरव्हाणचे माजी सरपंच मच्छिंद्र हाके व ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खाडे यांनी केले होते.प्रस्ताविक खेलबा ठोंबरे यांनी केले,सूत्रसंचालन भाजपा जिल्हा चिटणीस विनोद महानावर यांनी केले तर आभार भाजपा सहकार सेलचे अजिनाथ सुरवसे यांनी मानले या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव,तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे,शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,ता.सरचिटणीस काकासाहेब सरडे,बिटरगाव श्री गावचे माजी सरपंच डॉ.अभिजीत मुरुमकर,दादासाहेब देवकर,पांडे गावचे उपसरपंच नितीन निकम,किसान मोर्चा ता.अध्यक्ष सोमनाथ घाडगे,मकाई चे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे,नाना अनारसे,नामदेव भोगे,जयसिंग भोगे,आबा वीर,प्रदीप वीर,सुनील नेटके,मोहन नेटके,तुकाराम भोसले,अशोक सातपुते,विशाल घाडगे,अजय डवले,माणिक आप्पा निळ,लखन ढवळे,अतुल आतकरे,प्रकाश झोळ,संजय शेळके,सुशील थोरात,भारत पवार, अमोल पवार,संजय माने,गोरख भोगे,शशिराव भोगे,तात्या भोगे,विकास झोळ,बंडू सुरवसे,आबा वायसे,स्वप्नील घरबुडे,गणेश हाके,काका हाके,बाळू गोयकर,रवी खाडे,शहाजी हाके,पै.विठ्ठल हाके, काका शिंदे, रामा खाडे,औदुंबर घरबुडे,अमोल ओव्होळ,कृष्णा ओव्होळ,आबा ओव्होळ,बापू सुरवसे,धनराज सुरवसे,बालाजी वायसे,महादेव घरबुडे,रामदास लावंड,विठ्ठल पाटील, लक्ष्मण शिंदे,विकास हाके,संतोष भस्मे यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
*चौकट 1 :-* (फोटो गणेश चिवटे,जिल्हा सरचिटणीस, भाजपा )आज आपला तालुका शेजारील इंदापूर, बारामती या तालुक्याच्या दृष्टीने रोजगार,तंत्रज्ञान, शिक्षण व आरोग्य याबाबत खूप मागास आहे त्यामुळे दूरदृष्टीने काम उभे करावे लागेल.लोकांचे आशिर्वाद व त्यांचे प्रेम या बळावर मी आज ही लोकांची सेवा,मदत करू शकलो.भविष्यात याच लोकांच्या पाठिंब्यावर तालुक्यातील सामान्य लोकांच्या पाठीशी आणखी खंबीरपणे उभे राहण्याचे काम करणार आहे.
*चौकट 2:-* (फोटो-नितीन झिंजाडे -सरचिटणीस करमाळा भाजपा) एकीकडे करमाळा तालुक्यातील आजवरच्या राजकीय प्रस्थापित लोकांनी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार,कामगार यांच्या नावावर कर्ज काढून हजरो कुटुंबे देशोधडीला लावली तर दुसरीकडे गणेश चिवटे हे सर्वासामान्य माणसाच्या मागे खंबीरपने उभे राहत आहेत.त्यांना मदत करत आहेत.त्यामुळे लोकांच्या प्रश्नाची खरी जाण त्यांना असल्याने त्यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढवावी.
