विद्यार्थी हे देशाचे पूढील उज्वल भविष्य असून त्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शैक्षणिक साहित्याचे वाटप-लक्ष्मणराव बुधवंत
करमाळा प्रतिनिधी विद्यार्थी हे देशाचे पूढील उज्वल भविष्य असून त्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असून यातुन नक्कीच भावी पिढी आत्मनिर्भर होईल असे मत सामाजिक कार्यकर्त लक्ष्मणराव बुधवंत यांनी व्यक्त केले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा रावगांव, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगांव मधील विद्यार्थी विद्यार्थींना कालिंदा फाउंडेशन, वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट, काशीनाथ वणवे, विष्णुपंत गजेॅ युवा मंच ,रणजित दादा नलवडे मित्र परिवार यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक, आणि रावगांव ग्रामपंचायत,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावगांव,पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगांव यांच्या वतीने अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
