श्रावणमासानिम्मित सुरताल संगीत विद्यालयाच्यावतीने एकदिवशीय सौताडा सहल संप्पन
Iiiकरमाळा प्रतिनिधी सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने एक दिवशीय सौताडा येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते . श्रावण मासानिमित्त या सहलीचे आयोजन करण्यात आले होते… यावेळी सौताडा येथील मंदिरामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्यात आला तसेच हर हर महादेव च्या घोषणेने अगदी मंदिर परिसर भक्ती रसात मंत्रमुग्ध होऊन 8888i8गेला. या सहली मध्ये आठ वर्षाच्या विद्यार्थ्यापासून ते साठ वर्षापर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी धबधब्याच्या खाली पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. भारतीय संस्कृतीचे विद्यार्थ्यांना दर्शन घडावे हा या सहली मागचा मूळ उद्देश होता. सहलीचे आयोजन करण्या साठी सतीश वीर गुरुजी, अशोक बर्डे गुरुजी, सुनील जोशी साहेब, संतोष पोतदार गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. असे सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी दिली आहे.
