करमाळा

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बाजार समितीचे उपसभापती सौ. शैलजाताई मेहेर यांच्या शुभहस्ते व बाजार समिती संचालक शंभूराजे जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला .स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर बाजार समितीचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशभक्त कै. नामदेवरावजी जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बाजार समितीचे संचालक श्री शंभूराजे जगताप यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी सोलापूर जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे चेअरमन बबनराव मेहेर करमाळा तालुका गटसचिव पतसंस्थेचे चेअरमन अनिल सुरवसे बाजार समितीच्या माजी संचालिका सौ .सुप्रियाताई सुरवसे ,बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांच्यासह अधिकारी कर्मचारी ,उपस्थित होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group