करमाळासकारात्मक

हिवरे जिल्हापरिषद शाळेत झाली विद्यार्थ्यांची बॅंक!विद्यार्थी झाले मॅनेजर कॅशियर!

करमाळा प्रतिनीधी
बालपणापासूनच बचतीची सवय लागावी यासाठी हिवरे ता करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी बचत बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे बॅंकेचे कामकाज विद्यार्थीच सांभाळत असून, आत्तापर्यंत 80 खातेदार आहेत.विद्यार्थ्यांना बचत करण्याची सवय लागावी या हेतूने हि बॅंक सुरु करण्यात आली आहे.या उपक्रमामध्ये शाळेतील १ ली ते ७ वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा विविध माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग येत आहे. यामध्ये बँकेचे खातेदार, बँक मॅनेजर, कॅशियर, व्यवस्थापक, दररोजचा हिशोब या सर्व जबाबदा-या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वतः सांभाळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बचती बरोबर प्रत्यक्ष बॅंक कामकाजाचा अनुभव मिळत आहे. विशेष म्हणजे दर आठवड्यात कॅशियर मॅनेजर यांची बदली करून संधी दिली जात आहे.

या बँकेच भागभांडवल २ हजार रुपयांपर्यंत गेले आहे. व्यवहारासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र असे पुस्तक देखील केले असुन त्यावर दैनंदिन व्यवहार लिहिला जात आहे

या पैशातून विद्यार्थी वही, पेन इत्यादी साहित्य खरेदी करतात. त्यामुळे त्यांना बालपणापासून बचतीची सवय झाली आहे. त्याबरोबरच बँकिंगचे व्यवहार बालपणात समजू लागले आहेत. प्रयोगातून विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, असा उपक्रमाचा उद्देश आहे. शाळा मुख्याध्यापक सुग्रीव निळ, निळकंठ हनपुडे, जालिंदर हराळे, सतिश सुर्यवंशी, नवनाथ खरात, सुरेश शिंदे,पल्लवी कुलकर्णी दुधाळ गुरुजी, अंकुश माने आदिंचे मार्गदर्शन लाभत आहे.
शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष शंभुराजे फरतडे उपाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे व ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!