Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाकृषी

ओव्हरलोड ऊस वाहतुक व कर्णकर्कश आवाजात ट्रॅक्टर चालवणा-यावर कारवाईची मागणी

करमाळा प्रतिनिधी
ओव्हरलोड ऊस वाहतुक करून  कर्णकर्कश आवाजात ट्रॅक्टर चालवणा-या ट्रॅक्टर चालकावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष अभ्युदय डाळिंबे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या ऊसाचे वाहतूक सुरू आहे. ट्रॅक्टर द्वारे होणार्‍या वाहतुकी वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण, ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यावर मोठे खड्डे पाडतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे ट्रॅक्टर चालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी  तालुकाध्यक्ष अभ्युदय डाळिंबे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. 

तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले यावेळी लहु भालेराव , गाडे समिर शेख, बाळू जगताप,आकाश धनवे, अमन मुलानी , पप्पू पठाण आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .

तहसीलदार समीर माने यांना दिलेल्या  दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, सध्या करमाळा तालुक्यांमध्ये सर्वच ऊस कारखाने चालू झाले  आहेत.दररोज ऊस वाहतूक होत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे चालक कर्णकर्कश आवाजामध्ये नेहमी गाणी वाजवतात. त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असून त्याचबरोबर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस ज्या अतिरिक्त लाईट लावल्या जात आहेत.  त्याऐवजी ट्रॉली मागे लाईट किंवा रेडियमचे धोक्याचे चिन्ह लावणे गरजेचे आहे ते बहुतांश ट्रॉली मागे दिसून येत नाही. ते सक्तीचे करण्यात यावे. यामुळे होणारे अपघात निश्चित टाळता येतील शासन नियमालीनुसार ऊस वाहतूक न करणाऱ्या ट्रॅक्टर आणि चालकावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच ऊस कारखाना यांना सक्त सूचना देण्यात याव्यात आणि कङक कारवाई करण्यात यावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल. याबाबत  उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज व पोलीस निरीक्षक करमाळा यांना निवेदनाचे प्रती देण्यात आलेले आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group