कु.प्रतिक्षा पन्हाळकर हिने दहावीच्या परीक्षेत मिळावलेल्या यशाबद्दल बागल गटाच्यावतीने सत्कार.
करमाळा प्रतिनिधी. कु. प्रतिक्षा शिवाजी पन्हाळकर, सालसे या विद्यार्थींनी साडे बाॅर्डात इयत्ता दहावीला 95.00% मार्क घेत प्रथम क्रंमाक पटकवला आहे. सालसे गावातील शिवाजी पन्हाळकर हे बागल गटाचे कट्टर समर्थक आहे. करमाळा तालुक्याच्या माजी आमदार शामल मामी बागल यांनी शुभ आशीवार्द दिले. करमाळा तालुक्याच्या स्वभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय भैय्या बागल यांनी अभिनंदन केले. पुढील शिक्षणासाठी कोणतीही मदत लागली तर हक्काने करणार असल्याचे दिदींनी सांगितले. यावेळी गौंडरे गावचे युवा नेते ज्ञानेश्वर बिचितकर, शिवाजी पन्हाळकर आणी प्रतिक्षा यांच्या सहपरिवाराला आहेर देत त्यांचा सत्कार केला. बागल गटाने नेहमीच आपली माणसं परिवारासारखी जपली आहेत…

