करमाळा शहरातील हनुमान मंदीरात मनसेच्या वतीने महाआरती
करमाळा प्रतिनिधी किल्ला वेस येथील मारुती मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी (ता. ७) सायंकाळी श्री प्रभु हनुमानाची महाआरती झाली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष घोलप संजय, शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, सतिश फंड, तालुकाउपाध्यक्ष अशोक गोफणे, राजाभाऊ बागल, शहरउपाध्यक्ष सचिन कणसे, सोशल नेटवर्किंग अमोल जांभळे, केम शाखाध्यक्ष सुधीर धोत्रे, शेलगांव शाखाध्यक्ष सुरज वीर, पोमलवाडी शाखाध्यक्ष काळे, सुशिल नरूटे, माजी नगरसेवक प्रविण जाधव, संजय भालेराव, संजय घोरपडे, नागेश दुधाट, योगेश काळे, नागेश गुरव, मनोज गुरव व शहरातील हनुमान भक्त उपस्थित होते.
