Tuesday, April 22, 2025
Latest:
आरोग्यकरमाळा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा तालुका अध्यक्षपदी दीपक पाटणे यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी

शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडून तालुक्यातील प्रत्येक गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी कटबद्ध राहील अशी प्रतिपादन नवनियुक्त अध्यक्ष दीपक पाटणे यांनी केले आज निवडीनंतर सह्याद्री अतिथी गृहावर दीपक पाटणे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

दीपक पाटणे हे करमाळा तालुका मेडिकल असोसिएशन चे तालुकाध्यक्ष असून राशीन पेठ तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्यात उल्लेखनीय असे काम आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने विविध आरोग्य शिबिरे घेणे गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत उपचार करून देणे शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे या त्यांच्या कामाची दखल घेऊन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे.
या निवडीनंतर बोलताना दीपक पाटणे म्हणाले की रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असे समजून इथून पुढे काम करणार असून करमाळा तालुक्यातील गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देणे डायलिसिसची गरज असणाऱ्या लोकांना डायलिसिसची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करमाळा केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले

या निवडीबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे शहर प्रमुख संजय आप्पा शीलवंत उपशहर प्रमुख राजेंद्र काळे नागेश गुरव राशीन पेठ तरुण मंडळाचे कार्याध्यक्ष पिंटूशेठ गुगळे नीरज गुगळे जे जे युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे यांनी अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group