तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण र्देवळालीसाठी टँकर प्रस्ताव सादर करा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश-राहुल कानगुडे
करमाळा प्रतिनिधी
देवळाली येथे तीव्र पाण्याची टंचाई असून पिण्याची पाणी नसल्यामुळे जनावरे व माणसांना पाच पाच किलोमीटर पाण्यासाठी जावे लागत आहे यासाठी तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करावेत अशी मागणी शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवळाली साठी दिलेला विकास निधी परत पाठवण्याचे पाप ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी केले आहे आता निदान गोरगरिबांना सर्वसामान्यांना जनावरांना पिण्यासाठी पाणी देण्याचा तरी ठराव तात्काळ द्यावा अशी मार्मिक टीका राहुल कानगुडे यांनी केली आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोनवर संपर्क साधून पाणीटंचाई विशद केली यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी देवळालीसाठी पाणीपुरवठ्यासाठी टँकर चालू करण्याचे तात्काळ प्रस्ताव सादर करा असे आदेश गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना दिले आहेत
याबाबत बोलताना राहुल कानगुडे म्हणाले की
देवळाली गावाची साडेसात हजार लोकसंख्या असून ग्रामपंचायतीची पिण्याची पाणी योजना जवळपास बंद असून आठ दिवसातून एकदा पाणी येते
ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष असून दोन महिन्यापूर्वीच टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे देणे गरजेचे होते. मात्र ग्रामपंचायतच्या सदस्य व सरपंचांनी हे प्रस्ताव सादर केले नसल्यामुळे अद्याप टँकर मंजूर झालेली नाहीत
ग्रामसेवक नागरसे यांनीही दोन महिन्यापूर्वी प्रस्ताव देणे गरजेचे होते.मात्र हा प्रस्ताव ग्रामपंचायत बैठकीत ठेवा असा आग्रह धरल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित राहिले असल्याचा आरोप कानगुडे यांनी केला आहे
देवळाली येथील चांदणी वस्ती वैद्य वस्ती मोरे वस्ती गळके वस्ती राखुंडी ढेरे वस्ती शेरे वस्ती गुंड वस्ती जाधव वस्ती व गावठाण क्षेत्रात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून आज या संबंधित सविस्तर पत्र मनोज राऊत यांन मनोज राऊत यांना दिली असल्याची माहिती राहुल कानगुडे यांनी दिली आहे.
