करमाळा

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने माढा मतदार संघामध्ये जो उमेदवार देण्यात येईल त्याचा प्रचार करून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार- प्रतापराव जगताप

करमाळा प्रतिनिधी-  लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने माढा मतदार संघामध्ये जो उमेदवार देण्यात येईल त्याचा करमाळा कृषी उत्पन्न बाजार स चिंतामणी दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तन, मन, धनाने अहोरात्र प्रचार करून करमाळा तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस आय चे करमाळा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले. महाविकास आघाडीच्या वतीने धैर्यशील भैय्या मोहिते पाटील, अभयसिंह दादा जगताप, माजी आमदार नारायण आबा पाटील यापैकीच एकाला महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. करमाळा तालुका हा काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा तालुका आहे. स्वर्गीय नामदेवरावजी जगतापसाहेब यांचा खूप मोठा वारसा हा करमाळा तालुक्याला लाभलेला आहे. त्याचबरोबर आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा वर्ग देखील करमाळा तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या वतीने सर्वजण एक दिलाने काम करून जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला निश्चित स्वरूपात करमाळा तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी तालुक्यातील वाड्या वस्त्यापर्यंत जाऊन या निवडणुकीचे महत्त्व पटवून देऊन प्रत्येक बुथवरची बुथ यंत्रणा सक्षम करून भारतीय जनता पार्टी ही कशा पद्धतीने लोकशाही संपवून हुकूमशाही कडे घेऊन जात आहे… ईडी,सीबीआयचा,धाक दाखवून संपूर्ण देशामध्ये कशा पद्धतीने दबाव तंत्र वापरून फोडाफोडीचे राजकारण करत आहे या गोष्टीचाही पर्दाफाश करणार असल्याचे शेवटी श्री प्रताप जगताप यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group