शेतकरी ते पोथरे गावचे मा.सरपंच विष्णू रंदवे 26 मार्च वाढदिवस विशेष ग्रामस्थांच्यावतीने सायंकाळी नागरी सत्कार समारंभ
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन सत्य, प्रामाणिकता व कामाच्या जोरावर शेतकरी ते पोथरे गावचा सरपंच म्हणून त्यांनी काम केले आहे. या आपल्या कार्य कालावधीमध्ये वाड्या, वस्त्या वरील रस्त्याचे काम, पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी हातपंप तसेच दिवाबत्तीची सोय केली आहे. शनैश्वर मंदिर कार्यालयाचे कामही सरपंच रंदवे यांच्या
कार्यकालामध्ये झाले आहे. राजकारणाबरोबर समाजकारणाचा वारसाही त्यांनी जपला आहे. यामध्ये त्यांनी संजय गांधी, श्रावणबाळ, दत्तक पालक योजनेतून वृध्द, अपंग, निराधार लोकांना हक्काचे शासनातर्फे असंख्य लोकांना मानधन मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांचे हे काम अविरतपणे चालू आहे. निराधार असलेल्या लोकांना आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी शासकीय मदत मिळवून दिल्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्या बद्दल विशेष प्रेम व माणुसकीचे, आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.
सर्वसामान्य शेतकरी, समाजसेवक ते पोथरे गावचे सरपंच झालेले विष्णू अनंता रंदवे यांचा जन्म १९५३ साली एका सर्व सामान्य कुटुंबामध्ये झाला. घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने शिक्षण इयत्ता पाचवी पर्यंतच झाले. यानंतर शेती व्यवसाय करत असताना समाजसेवेची आवड निर्माण झाली. लोकांच्या अडीअडचणी, प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी सुरु केले. तहसील, पोलिस स्टेशन, कुठल्याही शासकीय कार्यालयातील काम करायचे म्हटले तर लोक त्यांच्याकडे आवर्जून येऊ लागले. रेशन कार्ड असो किंवा मतदान कार्ड काढायचे असो, कुणाचे पोलिस स्टेशनचे काम असो याबाबत तात्काळ मदत करुन लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम विष्णू तात्या रंदवे यांनी केले.लोकांचे काम विना मोबदला करत श्री. विठ्ठलराव शिंदे, पोथरे. याभागाचे प्रतिनिधीत्व देऊन काम करण्याची संधी द्यावी, अशी येथील जनतेबी मनोमन इच्छा आहे. सर्व सामान्य जनतेची निस्वार्थ सेवा केल्याने जनता आपणास कामाची पोचपावती नक्की देईल असा विश्वास विष्णू रंदवे यांनी व्यक्त केला आहे. आज त्यांचे वय 73 असूनही तरुणांना लाजवेल एवढ्या तडफदारपणे व पहाडीने जनतेचे काम करत आहे. जनतेच्या आशिर्वादाने या वृध्दापकाळामध्ये सुध्दा त्यांची तब्येत निरोगी व ठणठणीत आहे. जनतेची सेवा करत असल्यामुळे परमेश्वराने आपल्याला आरोग्य संपन्न आयुष्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यास विशेष आनंद वाटत असून स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता समाज कल्याणाचा विचार ते करतात. त्यांच्या या यशस्वी वाटचाली मध्ये त्यांची धर्मपत्नी गुणाबाई रंदवे यांची मोलाची साथ लाभली आहे.आपल्या कौटुंबिक जीवनामध्येही ते सुखीसंपत्र जीवन जगत असून दरवर्षी त्यांची मुले त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यांनी तीने मुली व दोन मुले असून तिही आपल्या वैवाहीक जीवनात सुखी व समाधानी जीवन जगत आहे. समाजकार्यातून जनतेची सेवा करत कुठलाही वारसा, परिस्थिती नसताना आपल्या कार्याच्या जोरावर सरपंच होण्याचा मान विष्णू रंदवे यांनी मिळवला आहे.एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन कुठलीही पार्श्व भूमी, वारसा नसताना स्वतःच्या कार्य कतृत्वाच्या जोरावर कार्यकर्ता, समाजसेवक ते पोथरे गावचे सरपंच होऊन जनतेच्या मनामध्ये आपली अढळ स्थान निर्माणे केले आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी मनामध्ये एखाद्या कामाबद्दल श्रध्दा असून प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असेल तर माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. त्याचे काम हेच त्याला जनतेच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करून यश मिळून देते याचे मा. सरपंच विष्णू रंदवे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
