आषाढी वारी पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना असुविधा होऊ नये म्हणून यासाठी अखंड सेवा देण्यासाठी शिवसेना युवा सेनेची आढावा बैठक संपन्न
करमाळा प्रतिनिधी :- आषाढी वारी काही दिवसांवर येऊ ठेपल्याने करमाळा तालुक्यात येणाऱ्या वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होऊ नये याकरिता खबरदारी घेण्यासाठी शिवसेना युवा सेनेची आढावा बैठक करमाळा येथे संपन्न झाली.
सदरची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. नामदार तानाजी सावंत यांनी मागील आठवड्यात पंढरपूर येथे शासकीय कर्मचाऱ्यांची आषाढी वारीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीसाठी करमाळ्यातून युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे व युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड उपस्थित होते.
पंढरपूर येथे झालेल्या आढावा बैठकीस अनुसरून करमाळा येथील पदाधिकारी सुद्धा पूर्व तयारी आढावा बैठक आयोजित करुन कामाला लागलेले दिसून येत आहेत. करमाळयातील बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून करमाळा तालुक्यात येणाऱ्या वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होऊ नये याकरिता बायपास रोड वरील शिवसेना युवा सेना मध्यवर्ती कार्यालय २४ तास खुले राहणार आहे. तसेच वारी कालावधीत सरकारी व खाजगी दवाखाने सुद्धा २४ तास सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत का? याची सुद्धा पाहणी शिवसैनिक युवा सैनिक करणार आहेत. त्याच प्रमाणे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, त्यांच्या चहापान व्यवस्था मध्यवर्ती कार्यालयात करणार येणार आहे. करमाळा तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा सज्ज व तत्पर राहण्यासाठी शासन स्तरावरून सुचना देण्यात आल्या असून त्याप्रमाणे कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती ही यावेळी शिवसेना युवा सेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, तालुका उपप्रमुख श्रीकांत गोसावी, दादासाहेब तनपुरे, विशाल पाटील, दादा थोरात, मनोज रोकडे, सुभाष पाटील, खंडू जगताप, शिवसेना शहर प्रमुख गीता हेंद्रे, उपशहर प्रमुख रुपाली पाटील, युवा सेना उपशहर प्रमुख अनिकेत यादव, गणेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
