मतदार कारखाना वाचणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील-आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ कारखान्याच्या अनेक निवडणुका झाल्या परंतु ही निवडणुक कारखान्याच्या अस्तित्वाची असल्याने सभासदांवर सुध्दा एक जबाबदारी आहे असे सांगुन मतदार कारखाना विकणाऱ्यापेक्षा कारखाना वाचणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील असा ठाम विश्वास आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केला. कविटगाव येथील सभेत ते बोलत होते. श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’ची प्रचार सभा कविटगाव येथे पार पडली. यावेळी
सभापती अतुलभाउ पाटील, केमचे माजी सरपंच अजितदादा तळेकर, कंदरचे सरपंच मौलाभाई मुलाणी, माजी सभापती शेखर गाडे , नितिनदादा हिवरे, नानासाहेब गोडगे, दादासाहेब मंगवडे, अखलाख जहागीरदार, संभाजी कांबळे महादेव दडस, संजय टकले बिभिषण सोनवणे, नारायण पांडव, संतोष कोपनर (माजी उपसरपंच), भैरू हराळे, कदम भाऊसाहेब, शिवाजी सरडे, विठ्ठल चौधरी, ज्योतीराम भोसले, आप्पा चौधरी, भाऊसाहेब जगदाळे, भिवा जाधव, आणा जाधव, विष्णू पाटील, यशवंत पांडव, पांडूरंग शिंदे, रामेश्वर चौधरी, उमेदवार महेंद्र पाटील, विजयसिंह नवले, दादासाहेब पाटील, रामेश्वर तळेकर, दत्तात्रय देशमुख आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की आदिनाथ कारखाना हा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरेल या उद्देशाने कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांनी या कारखान्याची उभारणी केली. आज हा उद्देश सफल करण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत. भविष्यात कारखाना उर्जित अवस्थेत आणुन या ठिकाणी बायप्राॅडक्ट तयार करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला ऊस दर देण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविक आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार शिवाजी सरडे यांनी मानले.
