Saturday, April 26, 2025
Latest:
Uncategorized

कोणी कितीही राजकारण करा.. आदिनाथ कारखाना सक्षमपणे फक्त संजयमामाच चालवु शकतात- श्री. अशोकराव पाटील.संचालक सोलापुर जिल्हा दुध संघ


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील राजकारणाची पातळी दिवसेंदिवस हिन होत असुन, आदिनाथला गर्तेतुन बाहेर काढणे हे एकमेव ध्येय असलेल्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे एकमेव नेतृत्वच आशेचा किरण आहे असे प्रतिपादन सोलापुर जिल्हा दुध संघाचे संचालक अशोकराव ऊर्फ राजेंद्रसिंह पाटील. केत्तुर यांनी केले आहे. आदिनाथच्या सभासदांना आवाहान करताना त्यांनी सांगितले की, विरोधक मामांवर जी टिका टिप्पणी करतात तीच मुळात चुकीची असुन, साखर उद्योगधंदयातली आव्हाने आणि सहकाराचा चांगला अभ्यास एकमेव मामांचा आहे. स्वतः भांडवलाची ऊभारणी कशी करायची आणि सरकारची मदत कशी मिळवणार हे फक्त मामाच सांगत आहेत. मात्र विरोधासाठी विरोधक अनेक गोष्टी बेछुट पणे मांडुन तुमचे आमचे मनोरंजन करत आहेत. परंतु आदिनाथची ही निवडणुक सर्वांनी गांभिर्याने घ्यावी लागेल. आदिनाथची मागिल निवडणुक झाली त्यावेळी मामा स्वतः पॅनलचे ऊमेदवार नव्हते परंतु आता स्वतः संजयमामा उमेदवार असुन अतिशय संतुलित पॅनलची निर्मिती केलेली आहे.
संजयमामांचा उद्देश स्पष्ट असुन विरोधक मात्र एकमेकांवर आवलंबुन फक्त गप्पा मारण्याचे काम चालु आहे. सन-२०१४ पासुन मामांनी करमाळा मतदारसंघात भरीव कामे केलेली असुन त्याची प्रचिती प्रत्येकाला येत आहेच. मामांना सरकारमधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे पाठबळ असुन आमदार रोहीतदादा पवार यांची साथ ही जमेची बाजु आहे. एकंदरीत यावेळी आदिनाथचा मतदार नक्कीच स्पष्ट भुमिका असणाऱ्या आणि सक्षम नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार संजयमामांच्या पाठीशी राहील अशी खात्री वाटते. आपण सर्व मतदारांनी आपले पवित्र मतदान देताना आदिनाथ बचावचा नारा देत मतदान करावे असे आवाहान श्री. अशोकराव पाटील यांनी केले आहे.
मी स्वतः तसेच सूर्यकांत भाऊ पाटील ,विलास दादा पाटील, तानाजी बापू झोळ, चंद्रहास बापू निमगिरे आम्ही सर्व खंबीरपणे मामांबरोबरच आहोत आमच्या वैयक्तिक कामामुळे अडचणीमुळे आम्ही राज्याच्या बाहेर होतो असे असताना विरोधक संभ्रम पसरवत आहे त्याकडे दुर्लक्ष करून सर्वांनी संजय मामांना साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group