Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल करमाळ्यात भाजपा कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष


करमाळा प्रतिनिधी :-राजस्थान,मध्यप्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल करमाळ्यात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.यावेळी बोलताना भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की, राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हे यश भाजपच्या पदरात टाकले आहे.या प्रसंगी कर्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दुमदुमून काढला.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,ता.उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,बाळासाहेब कुंभार,वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार,जि.चिटणीस विनोद महानावर,शाम सिंधी,ता.उपाध्यक्ष अजिनाथ सुरवसे,संजय घोरपडे,सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे,विजयकुमार नागवडे,महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे,चंपावती कांबळे,नितीन कानगुडे, दादासाहेब देवकर, पोथरेचे माजी सरपंच विष्णू रंदवे, प्रसिद्ध व्यापारी अशोक शहा, हर्षद गाडे,भैय्याराज गोसावी, विशाल घाडगे,दीपक गायकवाड,कैलास पवार,शरद कोकिळ, गणेश महाडिक, महादेव गोसावी,उमेश मगर, मस्तान कुरेशी, सूरज लष्कर, हनुमंत फरतडे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group