जिद्द चिकाटी परिश्रमाच्या जोरावर सौ.ऋतुजा शिवकुमार चिवटे हिंगमिरे यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद-विजयराव पवार
करमाळा प्रतिनिधी जिद्द चिकाटी परिश्रमाच्या जोरावर सौ.ऋतुजा शिवकुमार चिवटे हिंगमिरे यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे असे मत सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार यांनी व्यक्त केले. सौ.ऋतुजा शिवकुमार चिवटे हिंगमिरे यांची ग्राम महसूल अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विजयराव पवार यांच्या कुटुंबाचेवतीने तसेच गुरुदेव दत्त माऊली भक्त सेवा मंडळाच्या वतीने विजयराव पवार यांच्या धर्म पत्नी सौ.वंदनाताई विजयराव पवार यांच्या हस्ते पवार यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, उद्योजक शिवकुमार चिवटे, डॉ विजयकुमार गादिया, उद्योजक हनुमंत भांडवलकर मनोज कुलकर्णी कमलाई लॅबोरेटरीचे महेश गवळी सिध्देश्वर डास, अरूण जाधव उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना विजयराव पवार म्हणाले की सध्याची युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेमध्ये टिकून राहुन यश मिळवण्यासाठी जिद्द चिकाटी बरोबर कठोर परिश्रमाची गरज आहे. संघर्ष जीवनाचा अविभाज्य भाग असुन जितका मोठा संघर्ष तेवढेच मिळणारे यश मोठे असते.सौ ऋतुजा शिवकुमार चिवटे हिंगमिरे यांनी आपल्या यशाद्वारे आई-वडिलांचे ऋण फेडण्याचे काम केले असून हिंगमिरे चिवटे परिवाराचा नावलौकिक वाढवला असून त्यांचा आदर्श घेऊन आजच्या या युगातील मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी व आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात विजयराव पवार,पत्रकार दिनेश मडके नरेंद्रसिंह ठाकुर मनोज कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केले आभार महेश गवळी यांनी मानले.
