Monday, April 21, 2025
Latest:
आरोग्यकरमाळा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयामध्ये आरोग्यासंदर्भात केमिकल मुक्त शेतीविषयी मार्गदर्शन शिबिर

करमाळा प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय आणि श्री सदगुरु हर्बल शॉप करमाळा यांच्या संयुक्त विद्यमान येथे आरोग्यासंदर्भात तसेच केमिकल मुक्त शेतीविषयी मार्गदर्शन पर शिबिर घेण्यात आले. तसेच त्या संदर्भात प्रात्यक्षिक ही दाखविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद फंड सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. गजानन ननवरे आणि सौ रेश्मा जाधव मॅडम या उपस्थित होत्या.
आरोग्य विषयी पुढे बोलताना रेशमा जाधव मॅडम म्हणाल्या की,आरोग्य म्हणजे स्थूल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक, संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक, दृष्ट्या सक्षम असते, ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थ्याचा मुख्य निकस आहे. प्रत्येकाने आपल्या शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. वेळोवेळी शरीराची निगा राखणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आयुर्वेदिक वापरली पाहिजेत असेही त्या म्हणाल्या. तुलसी, एलोवेरा ज्यूस, लिव्ह केअर सिरप,गोमूत्र, डेटॉक्स फूट पॅच, राईस ब्रान ऑइल इत्यादी आयुर्वेदिक औषधाबद्दल त्यांनी माहिती देऊन त्याचे डेमो देखील दाखविण्यात आले. यावेळी प्रा भारत फंड सर, प्रा. शेख सर, प्रा नरारे सर, प्रा शिंदे सर, प्रा पाटील, प्रा चौधरी सर तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता . सूत्रसंचालन पुजा जाधव यांनी तर आभार वैभवी जाधव यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group