सर्वधर्मिय सामुदायिक विवाहाचा धगधगता यज्ञकुंड समाजकार्याचा वसा जपलेले युवा नेतृत्व गणेश भाऊ चिवटे
वाढलेल्या महागाई मुळे कित्येक वधू- वरांच्या मायबापांना कर्ज काढून हे लग्न सोहळे करावे लागत आहेत ,पुढे जाऊन याचे रूपांतर कर्जामुळे आत्महत्येत देखील होत आहे याचाच विचार करून गणेश भाऊ चिवटे त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्रांगणात होत असून सामुदायिक विवाह सोहळ्याचे भव्य दिव्य नियोजन करण्यात आले आहे आत्तापर्यंत एकवीस विवाह नोंदणी करण्यात आली असून सर्वधर्मिय सामुदायिक सोहळ्याचे यंदाचे पहिले वर्ष असून पन्नास विवाह करण्याचा मानस गणेश चिवटे यांनी केला आहे. हा विवाह सोहळा गणेश चिवटे यांच्या श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आला असून वर वधूंना संपूर्ण पोशाख संसार उपयोगी साहित्य याबरोबरच सुमारे वीस ते पंचवीस हजार वऱ्हाडी मंडळाची भोजनाची सोय करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यामध्ये वरांची घोड्यावरती स्वंतत्रपणे मिरवणूक काढण्यात येणार असून सर्व धर्मीय सोहळा असल्याकारणाने प्रत्येक जाती धर्माच्या चालीरीतीनुसार व परंपरेनुसार विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
श्रीराम प्रतिष्ठान मार्फत सामाजिक कार्य म्हणून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना गेली 13 वर्षापासून मोफत भात – भाजी वाटप व शहरातील गोरगरीब अनाथ वृद्धांना गेली 5 वर्षापासून दोन वेळचे जेवण देत आहेत, तसेच कोरोना काळात कोविड रुग्णांना आयुर्वेदिक काढा देऊन मदत केली, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
या विवाह सोहळ्याचे आयोजन करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी गोरज मुहूर्तावर सायंकाळी 6:00 वाजता करण्यात आले आहे , समाजकारणातून राजकारणामध्ये यशस्वी वाटचाल करीत भाजप तालुकाअध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांचे कार्य युवा पिढी बरोबरच राजकारणी लोकांना अंजन घालण्यासारखे आहे. समाजामध्ये अनेक लोकांकडे पैसा पद असते पण समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करणारी माणसे बोटावर मोजणी असतात तेच माणसे इतिहास निर्माण करतात.जनमाणसाच्या मनावर अधिराज्य करतात. त्यापैकी गणेश भाऊ चिवटे असून एक यशस्वी उद्योजक यशस्वी राजकारणी असतानाही आपल्या स्वखर्चाने गोरगरिबांच्या मुलांची विवाह करण्याची त्यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी असून त्यांच्या या कार्याला पाठबळ देणे गरजेचे आहे.गणेश चिवटे यांच्या वाटचालीस शुभेच्छा.
