राजुरीचे सरपंच डाॅ.अमोल दुरंदे यांच्या वाढदिवसानिम्मित 104 रक्तदात्यांचे रक्तदान विविध सामाजिक उपक्रमानी वाढदिवस साजरा
राजुरी , ता. करमाळा दि. 29.जानेवारी 2023 रोजी परिवर्तन प्रतिष्ठान ,राजुरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अमोल दादासाहेब दुरंदे( प्रथम लोकनियुक्त सरपंच,राजुरी ग्रामपंचायत व तालुका अध्यक्ष, सरपंच परिषद, करमाळा ) यांच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त राजुरी मधील राजेश्वर हाॅस्पिटल येथे 104 जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमामध्ये सामाजिक, राजकीय,शैक्षणिक इ. क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच करमाळा मेडिकोज गिल्डचे डॉक्टर देखील या प्रसंगी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी श्री कमलाभवानी रक्तपेढी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
याप्रसंगी डॉ.अमोल दुरंदे म्हणाले की, आपण सर्वजण दशकाहुन अधिक काळ सामाजिक काम करत आहेत.या कामातुन नवनवीन संकल्पना सुचत असतात . स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण, जलसंधारण,रस्ते निर्माण,विज, पाणी पुरवठा, शिक्षण, रक्तदान शिबिर या संबंधात असे विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात .परिणामी गाव बदलासाठी (परीवर्तन) आपण एकत्र येऊन काम करत आहोत .अलीकडे कोरोनानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सध्या रक्त संकलन केंद्रात रक्त बॅग तुटवडा हे लक्षात घेऊन, माझ्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन अनेक गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आपण रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहोत.आपण जेवढे रक्तदान शिबिर घेतले त्यातून अनेक गरजू रुग्णांना अल्प दरात रक्ताच्या पिशव्या उपलब्ध करून दिल्या. आणि यापुढेही उपलब्ध करूया.त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन अमौलिक अमुल्य ज्यांचे मुल्य करता येत नाही दान रक्तदान करून अनेक जिवांचे प्राण वाचवू.यामध्ये अपघातात झालेल्या अतिरिक्त रक्तस्राव, थँलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे त्यांनी म्हटले आहे. या प्रसंगी ,डॉ. विद्या दुरंदे,नवनाथ दुरंदे (प्रगतशील बागायतदार), गणेश दिगंबर जाधव (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती ), दादासाहेब गायकवाड ( माजी सरपंच गोयेगाव ),नरेंद्र सिंह ठाकुर( भाजपा तालुका सचिव), कोडलिंगे भाऊसाहेब( सचिव, राजुरी विकास सेवा सोसायटी ),संतोष गदादे,बंडू टापरे,मारुती साखरे सर, रामदास शिंदे, रेवन बोबडे, नागेश मोरे इ. उपस्थित होते.
