धैर्यशील मोहिते पाटलांना शहर व तालुक्यातून विजयी मताधिक्य देणार. – वैभवराजे जगताप
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असून जगताप गटाचा कार्यकर्ता हिच आमची ताकत आहे.याच ताकतीच्या जोरावर धैर्यशील मोहिते पाटील यांना शहर व तालुक्यातून निर्णायक विजयी मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही पुर्ण शक्तीनिशी प्रचार यंत्रणा राबवत आहोत.याचाच एक भाग म्हणून करमाळा शहरात होम टू होम प्रचार चालू आहे.शहरवासियांची पाच वर्षांत केलेली सेवा आणि शहरात झालेली विकासकामे यामुळेच शहरातून धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी व्यक्त केला.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील सुमंत नगर मोहल्ला गल्ली ,वेताळ पेठ,सावंत गल्ली ,मेनरोड, भवानी पेठ, मंगळवार पेठ, फंड गल्ली या भागात पदयात्रा काढून होम टू होम प्रचार करुन धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळेस माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे सावंत गटाचे युवा नेते नगरसेवक संजयराव सावंत ,माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,माजी नगरसेवक बबन पाटील, जोतिराम ढाणे,सुरेश इंदुरे,गणेश कुकडे,बाळासाहेब बलदोटा,बाळासाहेब कांबळे,शाहबाज घोडके,रोहिदास आल्हाट, तानाजी कुकडे,यांच्यासह जगताप गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
