Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाराजकीय

ज्या विश्वासाने जनतेनं मला निवडणून दिले त्या विश्वासाला तडा जाऊ न देता विकासाच्या बाबतीत कमी पडणार नाही- आमदार संजयमामा शिंदे

 

खडकी येथील ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार शिंदे गटात प्रवेश .

 करमाळा प्रतिनिधी

ज्या विश्वासाने जनतेनं मला निवडणून दिले त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही , अपेक्षाभंग होऊ न देता विकासाच्या बाबतीत कमी पडणार नाही , मी आतापर्यंत सगळ्या निवडणूका लढविल्या आहेत , त्यामुळे सामान्य माणसाची नाळ मला माहिती आहे , सुरवातीला हातात नकाशा घेऊन तालुक्यात फिरलो , पण आज कामाच्या जोरावर करमाळा तालुक्यात पुर्णपणे विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.
रविवारी 29 जानेवारी रोजी सायंकाळी खडकी तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश करण्यात आला . यावेळी आयोजित जाहीर सभेत आमदार शिंदे बोलत होते. आमदार संजयमामा शिंदे यांची गावातुन घोड्यावर बसवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी खडकी चे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खरात , सर्जेराव जाधव , सहदेव नागटिळक , बबन विहाळे , बाळासाहेब सुळ , माजी सरपंच काकासाहेब नागटिळक , जयसिंग विहाळे , रमेश गायकवाड , अरुण नागटिळक , दिलीप सुळ , शिवाजी शिंदे , अशोक गोडगे , चेअरमन दादा विहाळे , साहेबराव शिंदे , राजेंद्र भेगर , विजय शिंदे , अंकुश गायकवाड , शहाजी गायकवाड , बापु सुळ , पप्पू शिंदे , अशोक भिसे ,दिगांबर विहाळे , संजय विहाळे , पप्पू खरात , सतीश शिंदे , बाबासाहेब डोलारे , नवनाथ सुळ , अनिल सुळ , संभाजी शिंदे , अरविंद डोलारे , अतुल नागटिळक , अशोक नागटिळक , गोकुळ नागटिळक , नितीन सुळ , सतीश सुळ , तात्याराम शेगर , नामदेव शिंदे , नर्मदा क्षिरसागर यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी , महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे , लव्हे चे सरपंच विलास पाटील , वाशिंबे चे सरपंच तानाजी झोळ , सुजित बागल , पंचायत समिती सदस्य राहुल सावंत , महावीर साळुंखे , सोगांव चे सरपंच विनोद सरडे , अर्जुननगर चे सरपंच प्रकाश थोरात , उदय ढेरे , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे , गौतम ढाणे , युवराज गपाट , संचालक , आबासाहेब सरडे , देवा कोळेकर , रविंद्र गोडगे , संग्राम पाटील , चैतन्य पाटील , डॉ . राहुल कोळेकर , डॉ विकास विर , प्रवीण शिंदे गुरुजी , गणेश मंगवडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सर्जेराव जाधव यांनी केले . यावेळी सुजित बागल , गौतम ढाणे , राहुल सावंत , विलास पाटील , यांनी मनोगत व्यक्त केले . सुत्रसंचलन संभाजी झिक्रीकर यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group