अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करमाळा शाखेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने भव्य 375 फूट तिरंगा पदयात्रा
करमाळा प्रतिनिधी शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करमाळा शाखेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने भव्य 375 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली यावेळी अभाविपचे प्रदेश संघटनमंत्री अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या यात्रेत विद्यार्थी विद्यार्थिनी,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते. एकूण 500 जणांच्या उपस्थितीत ही यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण झाली.अतिशय उत्साहाने,आनंदाने निघालेल्या या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभाविप चे सौरभ शिंगाडे,संतोष कांबळे,संकेत दयाळ, पार्थ तेरकर,शुभम बंडगर ,भूषण फंड,सचिन पारवे, हितेश पुंज आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
