कुंभेज फाटा मार्गे करमाळा ते पुणे एसटी सेवा सुरू करण्याची मागणी.
⊄ प्रतिनिधी वाशिंबे.
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरीकांसाठी कुंभेज फाटा,ऊमरड,वाशिंबे चौक.जिंती,रामवाडी,करपडी फाटा मार्गे करमाळा ते पुणे एसटी सेवा सुरू करण्याची मागणी वाशिंबे येथील गणेश झोळ, सतिश झोळ,रणजित शिंदे,सुयोग झोळ,महेश झोळ,शुभम झोळ,अक्षय झोळ,तेजस झोळ यांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आगार प्रमुख कदम साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
करमाळा तालुक्यातील हा परिसर पुणे जिल्ह्यातील भिगवन,बारामती शहरांपासून नजीक असल्याने येथील गावे व्यवहारीक,शैक्षणिक दृष्ट्या या शहरांशी जोडली गेलीआहेत.या परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भिगवन, बारामती,पुणे या ठिकाणी जावे लागते.तसेच भिगवन येथे मोठी बाजारपेठ असल्याने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.परंतु येथे जाण्यासाठी दळणवळण व्यवस्था नाही.त्यामुळे येथील नागरीक,शालेय विद्यार्थी, नोकरदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे करमाळ्यासह, भिगवण,बारामती,पुणे येथे जाणे गैरसोयीचे होत आहे.
चौकट.
करमाळा आगारातून पुणे येथे जाण्यासाठी राशीन, भिगवण मार्गे दररोज नऊ बस सुटतात.जर सकाळी सुटणारी बस कुंभेज फाटा मार्गे वाशिंबे चौक, पारेवाडी, जिंती, करपडी फाटा मार्गे सुरू केली तर या भागातील एसटी सेवेपासून वंचित असणाऱ्या गावांसह ईतर पंधरा गावांना भिगवण, बारामती, पुणे येथे जाण्यासाठी सोईस्कर होणार आहे.
गणेश झोळ.
वाशिंबे ता. करमाळा.
