करमाळा शहरातील रेशन दुकानदार दादासाहेब पुजारींनी दिवाळीनिम्मित रेशनधारकांना केले आनंदाच्या शिधावाटप
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील स्वस्त धान्य रेशन दुकानाचे दादासाहेब पुजारी यांनी दिवाळी सणानिम्मित आलेल्याआनंदाचा शिधा गोरगरिबांना वाटून गोरगरिबांची दिवाळीआनंदात साजरी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे दादासाहेब पुजारी हे श्रीदेवीचामाळ याचे माजी सरपंच श्री कमलादेवीचे पुजारी असून स्वस्त धान्य दुकानाचे मालक आहेत.सर्वसामान्य गोरगरिब मध्यमवर्गियाना हक्काचे रेशन फोन करून देणारे दादा करमाळा नगरात प्रसिध्द असून विन्रम व तत्पर सेवा करुन गोरगरिबांना सेवा देणारे दादा पुजारी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आहेत. आंनदाच्या शिधावाटप करून सर्वसामान्याची दिवाळी गोड करणाऱ्या शिंदे सरकारचे व प्रत्येक रेशनकार्ड धारकाला शिधा वाटप करणाऱ्या दादाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
