सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने आरक्षणासाठी करमाळा बंद यशस्वी विविध मागण्याचे निवेदन

करमाळा प्रतिनिधी सकल मराठा समाज यांच्यावतीने आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद असून करमाळा शहर व तालुक्यातील सर्व दुकानदार छोटे-मोठे व्यापारी व्यावसायिक व्यापारी व यांना केलेल्या करमाळा बंदच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद म्हणून आज करमाळा शहरात कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना देण्यात आले. करमाळा शहरातील व्यापारी तसेच छोटे मोठे व्यावसायिक यांनी ही आपली दुकाने बंद ठेवुन मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या स्थगिती उठवली जावी तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत मराठा समाजाच्या भावना पोहचवण्यासाठी करमाळा शहर व तालुका बंदची हाक सकल मराठा समाज करमाळा यांचे वतीने देण्यात आली होती.
यावेळी बंद दरम्यान सकाळी १० वाजता ,छत्रपती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी मानाचा मुजरा करून मराठा समाजातील बांधवांनी एकत्र येऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. या बंदला शहरातील विविध सामाजिक, राजकीय व्यक्ती तसेच संघटनांनी पाठिंबा दिला होता. यामध्ये करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायणराव पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्र्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे ,शेतकरी, कामगार संघर्ष समितीचे दशरथराव कांबळे, करमाळा मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी, बहुजन मुक्ती मोर्चा, शिवसेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आदींनी पाठिंबा दिला होता.
मराठा समाजाच्या आरक्षणाची स्थगिती उठवली जावी तसेच समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत मराठा समाजाच्या भावना पोहचवण्यासाठी करमाळा शहर व तालुका बंदची हाक सकल मराठा समाज करमाळा यांचे वतीने देण्यात आली होती त्याला जनतेने व सर्वपक्षीय नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याने बंद शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने शंभर टक्के यशस्वीपणे संप्पन झाला.
