करमाळा शहर व तालुक्यात २० सप्टेंबर रोजी ५६ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात २० सप्टेंबर रोजी एकूण २७५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ५६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ३५ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात ११५ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात १६० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज ६८ जणांना उपाचार करून घरी सोडले असून आजपर्यंत ११३० जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ५१० जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या १६६३ वर जाऊन पोहोचली आहे. करमाळा शहरामध्ये पोलीस स्टेशन – १ पुरुष, मेनरोड – १ पुरुष, सावंत गल्ली – १ पुरुष, नागोबा मंदिर परिसर – १ पुरुष, शाहूनगर – २ पुरुष, १ महिला, जाधव प्लॉट – ६ पुरुष, ३ महिला, शिवाजीनगर २ महिला यांचा समावेश असुन ग्रामीण भागामध्ये खडकेवाडी – १ पुरुष, रिटेवाडी – १ पुरुष, जेऊर २ पुरुष, ४ महिला, सरपडोह – १ महिला, कोंढेज – १ पुरुष, १ महिला, हिसरे – २ पुरुष, (वांगी २) – २ पुरुष, कुंभेज – १ महिला, लिंबेवाडी – २ पुरुष, २ महिला, (केतूर२) – ५ पुरुष, ५ महिला, पुनवर – ५ पुरुष, १ महिला, निंभोरे – २ पुरुष यांचा समावेश असुन करमाळा शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
