Tuesday, April 22, 2025
Latest:
Uncategorizedराजकीयसोलापूर जिल्हा

देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांचा संजयमामा शिंदे गटात प्रवेश दहीगाव उपसासिंचनचे काम पुर्ण करण्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रतिपादन

करमाळा प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील राहीलेले सर्व प्रश्न आपण सोडविणार आहे. दहीगाव उपसा सिंचन योजना २०२४ पर्यंत शंभर टक्के पूर्ण करून १० हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार असल्याचे प्रतिपादन करमाळा आमदार संजय शिंदे यांनी देवळाली येथे जाहीर प्रवेश कार्यक्रमप्रसंगी केले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांनी सात ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्तेसमवेत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी आमदार शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच प्रतिनिधी धनंजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे, गहिनीनाथ गणेशकर, किसन चांदणे यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी शिंदे गटात प्रवेश केला. नेरलेचे माजी उपसरपंच काकासाहेब पाटील, लतीफ पटेल, महादेव लोंढे, रावसाहेब काळे यांनी ही आमदार शिंदे गटात प्रवेश केला.
देवळाली येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती स्व. कल्याण गायकवाड यांचे नावाने लोकवर्गणीतून प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराचा भूमिपूजन समारंभ सोमवारी शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी माजी आमदार जगताप म्हणाले, गट बदलणे, पार्टी बदलणे ही आमच्या करमाळा तालुक्यातील परंपरा आहे. तुमच्यासाठी मी शरद पवार यांच्या सारखा भर पावसात उभं राहणार आहे. त्याशिवाय तुम्ही मामाला २०२४ ला पुन्हा संधी देणार नाही. तालुक्यातील सर्व गटांचा जन्म जगताप गटातून झाला असल्याचे याप्रसंगी ते म्हणाले.
माढा पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी, जिल्हा दूध संघाचे माजी व्हा. चेअरमन राजेन्‍द्रसिंह राजेभोसले, मांगीचे ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, पंचायत समितीचे सभापती चंद्रहास निमगिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास राऊत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, पंचायत समितीचे सदस्य राहुल सावंत, आदीनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, डॉ. गोरख गुळवे, मानसिंग खंडागळे, करमाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब लबडे, विटचे सरपंच उदय ढेरे, ग्रामपंचायत सदस्य अमर भांगे, युवक नेते उमेश इंगळे, झरेचे सरपंच प्रशांत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुका अध्यक्ष शितल क्षिरसागर, कार्याध्यक्ष स्नेहल अवचर, राजेंद्र धांडे, लतीष पाटील, अशोक तकीक, सतीश शेळके, सुनील रेडे, माजी संचालक विवेक येवले उपस्थित होते.
मांगीचे सुजित बागल, राजेंद्र बाबर, गौतम ढाणे, सुहास गलांडे, राहुल सावंत, सरपंच आशिष गायकवाड, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी तर आभार ऍड. अजिंक्य गायकवाड यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group