Wednesday, April 23, 2025
Latest:
Uncategorizedकरमाळासोलापूर जिल्हा

मराठा आरक्षणाला सर्वच समाज घटकांनी पाठींबा द्यावा : माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास स्थगिती दिल्यामुळे आधीच आर्थिक , शैक्षणिक व सामाजीक दृष्ट्या मागासलेला मराठा समाज आणखीनच पिछाडीवर जावून मोठी आर्थिक विषमता होवून सामाजीक दरी निर्माण होण्याची शक्यता आहे . यासाठी सर्व मराठा समाज बांधवांनी एकजुटीने लढा देण्याची व त्यास सर्वच समाज घटकांनी पाठींबा देण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले . याविषयी बोलताना जगताप यांनी सांगीतले कि, महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण यांचेपासून शरद पवार यांचेसह सर्वच मराठा समाजाच्या मुख्यमंत्री व नेतेमंडळीनी महाराष्ट्रात कधीही जातीयतेला थारा न देता सर्वच अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली . यामुळे राज्यातील सामाजीक स्वास्थ्य टिकून राहिले . परंतु काळाच्या ओघात बहुसंख्येने शेतकरी असलेला मराठा समाज अल्प भूधारक शेतकरी ते मोलमजूरी पर्यंत येवून ठेपला आहे हे वास्तव आहे . यामुळे मराठा समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी, समाजाचे आर्थिक जीवनमानाचा स्तर उंचविण्यासाठी मराठा समाजाला आर्थिक निकषावरील, शैक्षणिक आरक्षण मिळणे व टिकणे अत्यंत गरजेचे आहे . यासाठी सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनीधींनी सामूहीकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे . तसेच इतर सर्वच जाती धर्माच्या नेते मंडळीनी व जनतेने देखील मराठा समाजाने वर्षोनुवर्षे घेतलेली समन्वयाची भूमिका व इतरांच्या कल्याणासाठी स्वतः केलेला त्याग याचा प्रामाणीकपणे विचार करून मराठा समाजातील भावी पिढी शेक्षणिक, सामाजीक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होणेसाठी मराठा आरक्षणावरील स्थगिती रद्द होणेसाठी प्रयत्न करून पाठींबा यावा असे कळकळीचे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले . यासंदर्भात माजी आ. जगताप यांचे आमदार संजयमामा शिंदे, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार शहाजीबापू पाटील यांचेशी बोलणे झाले असून आमदार संजयमामा शिंदे यांनी मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेवून मराठा समाज बांधवांच्या भावना त्यांना सांगून आरक्षणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले असल्याची माहिती देखील माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group