एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार लाडक्या बहिणींचा आशीर्वाद पावणार- संपर्कप्रमुख रवी आमले
करमाळा (प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या दीड हजार रुपये मिळत असलेले मानधन पुढील वर्षी तीन हजार रुपये होणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार असल्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे होतील असा विश्वास करमाळा तालुका शिवसेना संपर्कप्रमुख रवी आमले यांनी व्यक्त केला आहे.करमाळा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबूत करावे असे आवाहन केले आहे. करमाळा येथील लाडकी बहीण योजना प्रसार व अडचणी समजून घेण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी जे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख महेश चिवटे,उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे,बाळासाहेब वाघ मिस्त्री ,युवा सेना ओबीसी आघाडी जिल्हा प्रमुख सुरेश करचे,तालुकाप्रमुख सुनील विटकर शहर प्रमुख अंकुशराव जाधव,,युवा सेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड जेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशी,सोलापूर जिल्हा महिला आघाडी समन्वयक पद्मजा इंगवले महिला आघाडी शहर प्रमुख कीर्ती स्वामी,मुस्लिम महिला आघाडी सलीमा मुलानी दाही हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर खिंडी शाखाप्रमुख बाबासाहेब तोरणे,रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण मुख्यमंत्री योजना समन्वयक केशव साळुंखे,संजय जगताप,कैकाडी समाज अध्यक्ष सचिन माने बांधकाम कामगार आघाडी प्रमुख बंडू काळेसंजय जगताप,भाजप उद्योजक आघाडीचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी आधी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना रवी आमले म्हणालेकरमाळा विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येणाऱ्या विधानसभेला महेश चिवटे सारखा सक्षम उमेदवार आपल्याकडे आहे.यामुळे ही जागा कसल्याही परिस्थितीत मित्र पक्षांना सोडणार नाही
++++-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या शासकीय योजनेचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अद्यावत करमाळ्यात कार्यालय उभा करण्यात आले असून प्रत्येक योजनेचे ऑनलाईन अर्ज या ठिकाणाहून मोफत भरून दिले जात आहेत लाडकी बहीण बांधकाम कामगार वयोश्री योजना तरुणांसाठी विविध योजनातून कर्ज अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातील कर्ज हे सर्व फॉर्म भरून याचा फायदा लोकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे
+++++
पद्मजा इंगोले
महिला आघाडी जिल्हा समन्वयक
करमाळा तालुक्यात दहा हजार महिलांचे संघटन करण्याची उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून शिवसेना महिला आघाडी काम करत असून सर् सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून तालुक्यातील 118 गावात रोज एक ठिकाणी भेट देणार असल्याचे पद्मजा इंगोले यांनी यावेळी जाहीर केले.
