विनाअनुदानित महविद्यालयाच्या समस्याबाबत पुणे विद्यापीठाच्या प्र.कुलगुरु यांची संस्थाचालक व प्राचार्य यांच्या समवेत बैठक
भिगवण प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे यांच्या विनाअनुदानित महविद्यालयाच्या समस्येबाबत गुरुवार दिनांक.६/१०/२०२२ रोजी पुणे विद्यापीठात ही बैठक पार पडली.ह्या बैठकीस विनानुदानित महाविद्यालयाच्या संघटनेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ,मॉडर्न एज्युकेशन सोसायटी चे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, जाधवर इन्स्टिट्युट चे अध्यक्ष डॉ.सुधाकर जाधवर,डॉ.नितीन घोरपडे,प्रा.खरात सर हे विणानुदानित महाविद्यालयाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाच्या वतीने प्र.कुलगुरू डॉ संजीव सोनवणे,श्री.मुंजोबा रासवे हे उपस्थित होते.
या बैठकीत खालील मुद्द्यावर चर्चा करण्यात आली व त्याचे निवेदन देखील देण्यात आले.
(१) महाविद्यालयाचे शुल्क हे महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ करण्यात यावे.
(२) महविद्यालयात नवीन शाखा चालू करण्यासाठी प्राचार्य हे पद विद्यापीठ मान्य लागते व ते पद विद्यापीठ मान्य नसेल तर नवीन शाखेसाठी विद्यापीठ मान्यता देण्यात येत नाही.तरी या एका पदाची मान्यता लवकर द्यावी,जेणेकरून संस्थांना नवीन शाखा चालू करण्यासाठी अडचण येणार नाही.
३) नवीन महाविद्यालय/शाखा चालू करण्यासाठी विद्यापिठाचे ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते.या प्रमाणपत्रासाठी संस्थांना खूप अडचणी येतात व कालावधी देखील जास्त लागतो.तरी ही प्रक्रिया डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ,लोणेरे यांच्यासारखी सोयीस्कररीत्या करावी.
४) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी नवीन महाविद्यालय/शाखा चालू करण्यासाठी बृहत् आराखडा ची आवश्यकता असते व विद्यापीठ मान्यता घेण्यासाठी सप्टेंबर महिन्याची अंतिम मुदत असते.तरी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीचा बृहत् आराखडा लवकरात लवकर प्रकाशित करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली.
५) पूर्वी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांना AICTE व PCI ह्या दोन शिखर संस्था होत्या व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांसाठी AICTE ऐवेजी PCI ही शिखर संस्था ग्राह्य धरण्यात येते.तरी विद्यापीठाच्या सलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्य,प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या मान्यतेसाठी PCI या शिखर संस्थेची पात्रता ग्राह्य धरण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.वरील सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
