Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

मकाई निवडणुकीत प्रा.रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी घेतली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट कारखाना प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याची तक्रार

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखाना त्या निवडणुकीत विरोधकांनी आक्रमक पवित्र घेतला असून मकाई कारखाना प्रशासनाकडून कुठल्याही सहकार्य मिळत असल्याचा आरोप प्राध्यापक रामदास झोळ त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मकाई सहकारी साखर कारखान्याच्या 2017 ती 2023 पर्यंत साखर कारखाना मध्ये ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांच्या संपूर्ण यादी त्वरित उपलब्ध करावी शेअर्स रक्कम पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या रकमेची व्यवस्था आपल्या कार्यालयात करण्यात यावी कारखान्याचा थकबाकी दाखला आपल्या कार्यालयात मिळावा अशा मागणीसाठी विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन आपल्या तक्रारीचा पाढा वाचला यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून आपण माहिती घेण्यासाठी सहकार्य करू असे सांगितले यावेळी प्राध्यापक रामदास जवळ रवींद्र गोडगे सुभाष शिंदे संतोष वाळुंजकर गफुर शेख आनंद झोळ बापू वाडेकर बापू फरतडे मारुती नीळ दीपक शिंदे सोमनाथ जाधव अमोल घुमरे सुदर्शन शेळके अशोक लवंगारे कांतीलाल शिंदे उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group