Monday, April 21, 2025
Latest:
आरोग्यकरमाळासकारात्मक

शरीराला तूंदरूस्त ठेवण्यासाठी योग अंत्यंत प्रभावशाली असुन ताणतणाव मुक्तीसाठी योग प्रभावी- सूधाताई अळ्ळीमोरे

करमाळा प्रतिनिधी शरीर, मन, आणि आत्मा यांना संतूलनात आणण्याचे काम हे योग करत असतो शरीराला तूंदरूस्त ठेवण्यासाठी योग अंत्यंत प्रभावशाली असुन योगा फक्त व्यायामाचा प्रकार नसुन योगामुळे आपल्या संपूर्ण शरीराला कसरत प्राप्त होते.योगा केल्याने जीवनातील ताणतणाव नाहीसा होतो शरीर निरोगी बनते असे मत केंद्रीय राज्य महिला प्रभारी सूधाताई अळ्ळी मोरे यांनी व्यक्त केले.
करमाळा येथे पतंजली आढावा बैठकीच्या निमित्ताने गूरुप्रसाद मंगल कार्यालय येथे केंद्रीय राज्य महिला प्रभारी सूधाताई अळ्ळी मोरे, भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी श्री सूरेंद्र पिसे, पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी विशाल गायकवाड, मीडिया जिल्हा प्रभारी मधूकर सूतार,माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, समाजसेवक श्रेणीक खाटेर, पत्रकार सचिन जव्हेरी आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आढावा बैठकीमध्ये सर्वांनी एकदिलाने आणि एक मनाने काम करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी तालुका समिती चे गठन करण्यात आले असून श्री.हनूमानसिंग परदेशी (भारत स्वाभिमान तालुका प्रभारी), बाळासाहेब नरारे (तालुका पतंजली योग समिती प्रभारी), रामचंद्र कदम सर(तालुका किसान सेवा समिती प्रभारी), प्रविण देवी(तालुका यूवा प्रभारी), राधिका वांशिबेकर(तालुका महिला प्रभारी),
दिपक कटारिया (कोषाध्यक्ष), अजित नरसाळे (तालुका मीडिया प्रभारी) इत्यादीची नियूक्ती करण्यात आली असून माजी प्राचार्य जयप्रकाश बिले यांची जिल्हा समितीवर निवड करण्यात आली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group