युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांनी शहरवासीयांसाठी यावेळी ही केला गणेश आरती संग्रह प्रकाशित
करमाळा प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या काळात गावा गावामध्ये सांघिक शक्तीचे दर्शन दिसून येते यामुळे माणसामाणसातील नाती दृढ होताना दिसतात असे मत जयंत दळवी यांनी व्यक्त केले ते युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आरती संग्रह प्रकाशना निमित्त बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की या कालावधीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा संपन्न होतात लहानापासून मोठ्यांपर्यंत गुणवंतांना व्यासपीठ मिळते व दहा दिवस परिसरामध्ये अनोखी ऊर्जा दिसून येते
श्री चव्हाण यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आरती संग्रह प्रकाशित करून भाविक भक्तांना सर्व प्रकारच्या आरत्या मंत्र उपचार हे आरती वेळी उपयोगाला येणार आहेत
यावेळी भाजपा प्रदेश सचिव दीपक चव्हाण,
भाजपा तालुका सरचिटणीस श्याम सिंधी ,संजय गांधी निराधार योजनेचे माजी सदस्य नरेंद्रसिंह ठाकूर ,दर्शन कुलकर्णी, किरण कांबळे, प्रेम परदेशी आदी उपस्थित होते..