करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी करमाळा एस. टी. स्टॅण्ड मधील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणा-या महीलांच्या ताब्यातुन चोरीतील 36,000/- रूपये किमतीचे मोबाईल जप्त


करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी करमाळा एस. टी. स्टॅण्ड मधील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणा-या महीलांच्या ताब्यातुन चोरीतील 36,000/- रूपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
यात हकीकत अशी की दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11/30 वाचे सुमारास फिर्यादी नामे मोहीनी शहाजी मोरे वय 40 वर्षे रा शेळगाव ता परंडा जि धाराशिव सध्या रा सातववाडी हडपसर पुणे ह्या आपल्या गावाकडे जाणे करता पुणे येथुन करमाळा एस.टी बस मध्ये येत असताना सकाळी 11/30 वा सुमारास करमाळा बस स्टॅन्ड मध्ये पुणे गाडीतुन उतरून परंडा एस.टी बसमध्ये चढत असताना त्याचा ओपो रेनो प्रो 4 कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादिच्या समंती वाचुन चोरून नेला आहे अशा आशयाची हकिकत सांगत असल्याने करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं 758/2025 भारतीय न्यांय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदर फिर्यादिचे अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांना सदर गुन्ह्यातील आरोपी महिला असल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना व महिला अंमलदार यांना योग्य त्या सुचना देऊन गुन्हे तपासाच्या अनुषांगाने C.C.T.V. पाहण्यासाठी व तपास करण्यासाठी पथके तयार करून हहीत रवाना केले. C.C.T.V. व्हिडीओ फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने सदर महिलेसाठी पथकानी तात्काळ योग्य असा सापळा लावुन महीला आरोपीस पकडले. त्यानंतर त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याची नावे
1) छकुली प्रशांत भोसले वय 24 वर्षे रा. करपाडी ता. कर्जत जि. आहिल्यानगरअसे सांगितले त्यावेळी त्यांना महिला पोलीस अंमलदार यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिला पंरतु त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अंनुषगाने महिला पोलीस अंमलदार यांनी आधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांनी निवेदन पंचनामा करणेस निवेदन दिल्याने गुन्ह्यातील 36,000 रूपये किंमतीचा ओपो रेनो प्रो 4 कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पो. उपनिरीक्षक दादासाहेब वाडगे हे करत आहेत
सदरची कामगिरी ही श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस.सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकों/ 1648 अजित उबाळे, पोना 1162 मनिष पवार, पोना/912 वैभव ठेंगल, पोकों 856 अर्जुन गोसावी, पोकॉ/438 रविराज गटकुळ, पोकॉ/1524 अमोल रंदिल, पोकॉ/689 योगेश येवले, पोकॉ/168 मिलीद दहिहांडे, पोकॉ/961 गणेश खोटे, मपोकॉ/166 पारधी तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोहेका / 222 व्यकंटेश मोरे यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!