करमाळा तालुका राष्ट्रवादी काॅग्रेंसच्यावतीने 9 डिसेंबर रोजी वेध भविष्याचा राष्ट्रवादी मंथन शिबिराचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका राष्ट्रवादी काॅग्रेंसच्यावतीने वेध भविष्याचा राष्ट्रवादी मंथन शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा तालुक्याच्यावतीने 9 डिसेंबर रोजी करमाळा येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे व युवक जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी दिली आहे.
शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी आमदार संजय मामा शिंदे यांचे संपर्क कार्यालय बायपास रोड, करमाळा या ठिकाणी
वेळ:- सकाळी 10 ते सायंकाळी 5,
भोजन:- 2 ते 3 दरम्यान.
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे..*
1) सकाळी १० वाजून १० मिनिटाला झेंडावंदन होणार आहे..
2) प्रस्तावना : तालुकाध्यक्ष यांच्याकडून
3) सन्माननीय जिल्हाध्यक्ष यांचे भाषण..
4) कार्यक्रमास उपस्थित प्रमुख वक्ते यांचे मार्गदर्शनपर भाषण..
5) एलईडी स्क्रीनवर शिर्डी येथील झालेल्या सभेतील महत्त्वाचे 6 भाषण दाखवण्यात येतील…
6) २ ते ३ दरम्यान भोजन.
7) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत ॲप डाऊनलोड करून इंस्टॉल करण्यासाठी २० मिनिटांचा वेळ…
8) कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.
अशी कार्यक्रमाची रूपरेषा राहील…
*हा सर्व कार्यक्रम प्रदेश कार्यालयाला फेसबुक लाईव्ह राहणार आहे त्यामुळे सर्वांनी वेळेत उपस्थित राहून झेंडावंदन करणे महत्त्वाचे आहे व कार्यक्रमास उपस्थिती व कार्यक्रम संपून जाताना आपल्या एका रजिस्टरवर दोन्ही वेळच्या सह्या घेऊन प्रदेश कार्यालय येथे पाठवण्यात येणार आहे तरी सर्वांनी या गोष्टीची दक्षता घेऊन आपली उपस्थिती दर्शवावी.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे आजी माजी अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांसाठी हा कार्यक्रम बंधनकारक राहील याची नोंद सर्वांनी घ्यावी व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
