दुध पावडरसाठी उद्योजकांना 50 रुपये अनुदान देण्यापेक्षा दुध उत्पादक शेतकऱ्यांना 30 रुपये लिटर भाव देऊन शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा महेश चिवटे यांची मागणी.

करमाळा प्रतिनिधी दूध आंदोलनाच्या नावाखाली दूध पावडर ला 50 रुपये प्रति किलो अनुदान मागणी ही दूध प्रकल्प चालवणाऱ्या उद्योजकांना अनुदान मिळवून देण्यासाठी सुरू केलेली चळवळ आहे असा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे . दूध उत्पादक शेतकऱ्यांना 30 रुपये लिटर भाव मिळाला पाहिजे व जे काही शासन अनुदान देणार आहे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजे ही मागणी योग्य आहे. मात्र ही मागणी पुढे करून दूध पावडर निर्यातीला अनुदान मागणी म्हणजे दूध उत्पादक क्षेत्रातील उद्योजकांना अब्जावधी रुपयांची अनुदानाची लॉटरी देण्याची तयारी आहे. सध्या सर्व दूध प्रकल्पांमध्ये लाखो मेट्रीक टन दूध पावडर पडून आहेत ही दूध पावडर बनवण्यासाठी या प्रकल्पांनी शेतकऱ्यांकडून 16 ते 18 रुपये लिटर दराने दूध खरेदी केले आहेत आता जर ह्या तयार झालेल्या पावडरला अनुदान दिले तर ते उद्योजकांच्या घशात जाणार आहे गेली चार ते पाच महिन्यापासून 18 रुपये लिटरने ज्या शेतकऱ्यांनी दूध विकले त्याला याचा फायदा होणार नाही मागील काळात सुद्धा दूध पावडरला अनुदान देऊन उद्योजकांची घरे भरण्यात आली होती.केवळ ज्या दुधा पासून पावडर तयार केली जाते अशाच दुधाला अनुदान मागील काळात दिले होते मात्र या काळात उद्योजकांनी पॅकिंग दूध व इतर उपपदार्थ निर्मिती साठी वापरलेल्या दुधावर सुद्धा अनुदान उचलून शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला या सर्व प्रकाराला पाठीशी घातले गेले . गेल्या वर्षीचे शासनाने दिलेले अनुदान अजून काही प्रकल्पांनी शेतकऱ्यांना दिलेले नाही. दुधाच्या नावावर निर्यात पावडर अनुदान मागायचे व स्वतःचे घरे भरायची हा धंदा दूध पावडर प्लांट चे मालक व शासकीय अधिकारी मिळून करत आहेत यामुळे दूध पावडर ला निर्यात अनुदान देऊ नये शेतकऱ्यांना. जी मदत करायची आहे ती थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर दुधा प्रमाणे जमा करावे .मागील काळात जे दूध पावडर ला अनुदान देण्यात आले .त्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करावी व ज्या दूध प्रकल्पांनी पॅकिंग दूध मला श्रीखंड पेढा चॉकलेट बर्फी अशा पदार्थांसाठी वापरलेल्या दुधाच्या अनुदान लाटलेल्या दूध प्रकल्पांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.
