Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीसकारात्मक

अखिल भारतीय स्वयंअर्थसहाय्यित टेक्निकल संस्थांच्या सचिव पदी प्रा.रामदास झोळ यांची निवड.*

 

करमाळा प्रतिनिधी
प्रा.प्रविण अंबोधरे अखिल भारतीय फेडरेशन ऑफ सेल्फ फायनान्स टेक्निकल इन्स्टिट्यूशन च्या सचिव पदी महाराष्ट्र राज्यामधुन प्रा.रामदास झोळ यांची निवड झाली आहे,प्रा.रामदास झोळ हे असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन्एडेड इन्स्टिट्यूटस इन रुरल एरिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून देखिल ते सध्या आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये कार्यरत आहेत.असोसिएशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे व शैक्षणिक संस्थांचे विविध प्रश्न अडी अडचणी सोडवुन न्याय देण्याचे काम प्रा.झोळ सतत करत असतात, ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांचा पाठपुरावा शासन दरबारी करुन त्या अडचणी निश्चित स्वरुपात प्रा.रामदास झोळ सोडवत असतात.

या निवडीबद्दल बोलताना प्रा.झोळ म्हणाले की, असोसिएशनच्या माध्यमातून बी.फार्मसी व इंजिनिअरिंग प्रवेशासाठी असणारी गुणांची अट 15 मार्कांनी शिथील करण्यात आली, एमसीए अभ्यासक्रम पूर्ण भारतामध्ये तिनं वर्षाऐवजी दोन वर्षांचा करण्यात आला, महाराष्ट्र शासनामार्फत स्थापन केलेल्या प्रवेश नियामक समितीचे सन 2016 पासुन ते सदस्य आहेत, तसेच शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यासाठी सतत शासन दरबारी पाठपुरावा केला तसेच प्रवेश प्रक्रियेत अनेक बदल करुन घेतले जसे कि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील प्रथम वर्षाचे शिल्लक राहिलेल्या जागा द्वितीय वर्षाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे झाला,
इत्यादी कामे असोसिएशन मार्फत वेळोवेळी संबंधित विभागातील मंञी व अधिकारी यांना भेटुन पाठपुरावा केला वेळप्रसंगी देशाचे नेते खा.शरदचंद्रजी पवार यांची भेट घेऊन कामे मार्गी लावली अशी माहिती प्रा.झोळ यांनी दिली, व यापुढेही ग्रामीण व शहरी भागातील स्वयंअर्थसहाय्यीत शैक्षणिक संस्थांना न्याय देण्याचे काम देशपातळीवर देखिल करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे वरिल सर्व कामांची दखल देशपातळीवर घेऊन प्रा.रामदास झोळ यांची अखिल भारतीय फेडरेशन ऑफ सेल्फ फायनान्स टेक्निकल इन्स्टिट्यूशन संस्थेच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group