करमाळा आगाराचे एसटी चालक श्री धनंजय सावंत सेवानिवृत्त कर्मचारी मित्रांकडुन सत्कार
करमाळा प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळ करमाळा आगाराचे चालक श्री धनंजय सावंत हे 33 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त श्री सावंत हे महाराष्ट्र एसटी कामगार सेना करमाळा आगाराचे अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कामगारांचे बरेचसे प्रश्न सोडवण्यास मदत केली श्री धनंजय सावंत यांनी गेली 33 वर्ष एसटीची अविरत सेवा केली ,त्यांचा हसतमुख व बोलका स्वभाव असल्यामुळे एसटी प्रवाशांशी त्यांच अनोखे नाते होते, त्याच्या सेवानिवृत्ती निमित्त करमाळा आगारातील एसटी डेपो मध्ये कर्मचाऱ्यां कडून विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले यावेळी एसटीतील चालक वाहक सह कर्मचारी व मित्रपरिवार उपस्थित होते,
