अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा यांच्यावतीने अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ केल्याने प्रशासनाचे कौतुक
करमाळा प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी आदेश प्रशासनाला दिला नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करावे या आदेशाची करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री समीरजी माने साहेब करमाळा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत साहेब तालुका कृषी अधिकारी मा. संजय वाकडे साहेब महसूल चे सर्व मंडळाधिकारी, सर्व तलाठी, सर्व कोतवाल कृषी मित्र सर्व ग्रामसेवक सर्व कृषी सहाय्यक इ. कर्मचाऱ्यांनी पावसाची चिखलाची परवा न करता ऐन दिवाळीमध्ये सुधा कर्मचाऱ्यांनी सुट्टी न घेता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे केल्याबद्दल त्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिनंदन पत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुका अध्यक्ष ॲड. श्री शशिकांत नरुटे कोषाध्यक्ष श्री भीमराव कांबळे सचिव श्री संजय हांडे सहकोशाध्यक्ष अजीम खान सकाळचे पत्रकार मा. आण्णा काळे बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर प्रहार संघटनेचे श्री सागर पवार आधी जण उपस्थित होते.
