Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळा

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या तक्रारीनंतर विठ्ठल  रिफाईन्ड शुगरला प्रदूषण थांबवण्याचे आदेश करमाळा शहरवासीयांना दिलासा

 

करमाळा, ता. 20:श्री.विठ्ठल रिफाईन्ड शुगर प्रा . लि .पांडे, ता.करमाळा या कारखान्यामुळे होणा-या . प्रदूषणाबाबत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कारखाना स्थळावर होणा-या प्रदूषणाबाबत पाहणी करण्यात आली असून  होणाऱ्या प्रदूषणाबाबत कारखान्याला समजपत्र देण्यात आले आहे.
  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी निखिल मोरे यांनी हे समजपत्र  कारखान्याला दिले आहे.यामुळे करमाळा शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
   माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी विठ्ठल रिफाईन्ड शुगर या शहरालगत असलेल्या कारखान्याचे प्रदूषण होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे , बाॅयलरची
राख मोठ्या प्रमाणावर पडत असून राखेच्या प्रदूषणामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण नियंत्रण मंडळाकडे केली होती.

त्यानंतर या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली आहे.होणाऱ्या प्रदूषणाच्या अनुषंगाने आढळून आलेल्या त्रुटी संदर्भात कारखान्याला समज पत्र देण्यात आले आहे.तसेच कारखान्याकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबत तात्काळ जाहीर खुलासा करण्याचे आदेशही कारखान्याला देण्यात आले आहेत.
.
*विठ्ठल रिफाईन्ड शुगर प्रा . लि . हा कारखाना शहरालगत असल्याने कारखान्याच्या प्रदूषणाने नागरिकांना त्रास होत आहे,नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, कारखाण्याचे बॉयलरची राख मोठ्या प्रमाणावर ती संपूर्ण शहरात पडत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्यानंतर मी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील कारवाई केली आहे. कारखान्याचे प्रदूषण कायमस्वरूपी थांबावे अशी आमची मागणी आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप, करमाळा .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group