करमाळा शहरात 7 डिसेंबरला छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळयाला अभिषेक करुन करमाळा बंद
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, शिवभक्त बांधवांना कळविण्यात येते की युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोषारी व इतिहासाचे विकृतीकरण व जाणीवपूर्वक अपशब्द वापरुन समस्त शिवप्रेमी अनुयायांची भावना दुखावल्यामुळे करमाळा शहर कडकडीत बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक होणार आहे आपण सर्वांनी उपस्थित रहावे..
वार:- बुधवार दि:- 7 डिसेंबर 2022
वेळ:- सकाळी 10:00 वा ठिकाण:- “छत्रपती चौक” भवानी पेठ, करमाळा जि, सोलापूर
