Tuesday, April 22, 2025
Latest:
Uncategorized

छत्रपतीचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्रिवेदी लाड दानवे हटाव याची घोषणा देत करमाळा शहर व तालुक्यात 100% बंद यशस्वी

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्राचे संपूर्ण हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेले बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी .सुधांशू त्रिवेदी मंगल प्रभात लोढा प्रसाद लाड रावसाहेब दानवे यांनी अवमानकारक वक्तव्य करून शिवाजी महाराज चा अवमान केला आहे. महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्र निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी ,प्रसाद लाड यांची तात्काळ हकालपट्टी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शासन असल्याचे या शिंदे भाजप सरकारने दाखवून द्यावे अशी शिवभक्ताची भावना आहे. करमाळा शहरांमध्ये छत्रपती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून करमाळा बंद पुण्यात आले आहे. या करमाळा शहरातील बंदला पूर्ण तालुक्यातून शंभर टक्के पाठींबा मिळाला असून तालुक्यातील प्रत्येक गावाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करून जाहीर पाठिंबा देत संपूर्ण गाव शंभर टक्के बंद पडणार असे पत्र दिले आहे. करमाळा शहरातील शिवप्रेमी नागरिक, व्यापारी संघटना, सुवर्णकार संघटना, नाभिक संघटना ,मुस्लिम विकास परिषद आरपीआय, भारत मुक्ती मोर्चा, उध्दव ठाकरे यांची शिवसेना, बारा बलुतेदार संघना बुरूड समाज, महात्मा फुले समता परिषद,सकल मराठा समाज काॅग्रेंस आय मातंग समाज संघटना बहुजन बांधव यांच्यासह सर्व शिवभक्तानी नागरिकांनी या मोर्चाला पांठिबा दिला आहे करमाळा शहर व तालुका शंभर टक्के बंद मध्ये सहभागी झाला असून शंभर टक्के बंद पाळण्यात आलेला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group