करमाळा

पंचवीस वर्षाची अतुट मैत्री ही दोस्ती तुटायची नाय

पंचवीस वर्षाची अतुट मैत्री  मित्रांनो मी दिनेश मडके पत्रकार व माझा पत्रकार मित्र नरेंद्र ठाकूर यांच्या मैत्रीला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली काळाच्या ओघांमध्ये व परिस्थितीनुसार बदलणारी आणखी अनेक माणसे भेटले काही लोक तात्पुरत्या कामापुरते आमच्या जवळ आले कामापुरते त्यांनी संबंध ठेवले काही लोक आमच्या जवळ येऊन उभा राहिले मित्रत्वाच्या अनाबाका घेऊन एकामेकाची परिस्थिती बदलण्याची भाषा करणारे आता रस्ता बदलून आपली वाटचाल करत आहे. परंतु नरेंद्रसिंह ठाकुर हा मित्र मात्र कुठल्याही आर्थिक आमिषाचे प्रलोभनाला बळी न पडता निरपेक्ष मैत्री करणारा जिवलग मित्र आहे .आमच्या दोघांमध्ये एक साम्य आहे की आपला स्वाभिमान कुणापुढे गहाण ठेवायचं नाही कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही पण काम असणाऱ्या माणसाला त्याचे कौतुक करून त्याला माणसाला मान द्यायचे विसरायचे नाही. खरे बोलल्यामुळे काही लोकांना राग येतो परंतु जगाचा अनुभव आल्यानंतर ते आमचे पक्के मित्र होतात हा आमचा अनुभव आहे.आपण खोटेपणाचा अभिनय करत असलो तर तो परमेश्वर आपल्याला पाहत आहे. याची जाणीव ठेवून आम्ही सत्याच्या मार्गावर चालत असून .संघर्षातून चांगल्या लोकांच्या सहकार्यांने पाठबळाने आमची वाटचाल चालू आहे . फायद्यासाठी अनेक मित्र झाले कामापुरते त्यांनी संबंध ठेवले नंतर आणखी कोणाकडे काय फायदा मिळाला तर त्याच्याशी मैत्री केली जुने मित्र विसरले नवीन मित्र तयार केली परिस्थिती जशी बदलेल तशी मित्राची मैत्री केली.अनेक मित्र आमच्या पुस्तकावर शिकली ती  नोकरीला लागली परिस्थिती बदलली ती बदलली. परंतु नरेंद्र आणि माझी मैत्री ही विश्वासवर प्रेमावर अवलंबून असून व्यवहारापेक्षा निखळ निरपेक्ष मैत्री असून संकटकाळी एकामेकाला मदत करण्यापासून एकामेकांच्या साथीने खंबीरपणे उभा राहून पंचवीस वर्षे मैत्रीची पूर्ण केली आहे. व्यवहाराने जोडलेली माणसं बुद्धीने फायद्याचा विचार करतात परंतु मनाने जोडलेली माणसे आपल्या आत्मिक नात्याचा विचार टिकवण्यासाठी आर्थिक फायद्याचा विचार करत नाही. काही लोकांनी खोटी स्तुती करून पैसा भरपूर कमवला आम्हाला मात्र माणुसकीचे नाते जपल्यामुळे माणसांची श्रीमंती मिळाली हेच नाते अतूट व आत्मिक समाधान देणारे असते  व्यवहारापेक्षा मैत्रीच्या नात्याला वाव दिला आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group