Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाशैक्षणिक

मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळणे हि काळाची गरज -सुनिल शिंदे

करमाळा प्रतिनिधी  शाळेत फक्त पुस्तकी ज्ञानमिळवणे म्हणजे शिक्षण नाही तर जीवन जगताना येणाऱ्या अडचणी स्वतः सोडवण्या चे ज्ञान असणे गरजेचे असून ते ज्ञान शालेत देता आले पाहिजे. असे उपक्रम शालेत राबवले पाहिजेत असे मत मुख्याध्यापक श्री सुनिल शिंदे यांनी व्यक्त केले आहे ते जिल्हा परिषद प्राथ खंबेवाडी या शाळेच्या आनंद बाजार या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि या शाळेचे पाटील सर व गायकवाड मॅडम हे दोघेही उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांनी इयत्ता चौथी मध्ये पहिला दुसरा, व तिसरा येणाऱ्या विध्यार्थ्यांना अनुक्रमे 501,301,201 अशी बक्षीसे जाहीर केली.विशेष म्हणजे ऊस तोडणी साठी आलेल्या मुलांना देखील या बाल मेळाव्यात सहभागी केले होते.
यावेळी शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सुशील नरुटे,ग्रामपंचायत पांडे च्या सरपंच सौं अनिता मोटे, सदस्य लांडगे, सदस्य सौं सुकेशिनी खटके, अंगणवाडी सेविका इंदुमती देवकते, बानू मोटे, स्वाती गोरे, सोमा नरुटे, आबा टकले, सुधीर वयकुळे, शोभा गोफने, वंदना शिंदे, सुमन कांबळे,बाळासाहेब कोळेकर, अण्णासाहेब सुपवर, झुंबर नरुटे, कांबळे, पत्रकार राजेश गायकवाड उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group