Saturday, April 26, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यामध्ये आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीलाबरोबर घेऊन लढणार – प्रतापराव जगताप

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष सक्षमपणे काम करत असून येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असून स्थानिक पातळीवर युती न झाल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी सांगितले. येत्या काही दिवसभरामध्येच स्थानिक नगरपालिका कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका याबरोबरच लोकसभा याची निवडणूक लागणार असून सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना भाजप यांचे सरकार आहे .साठे लोटे चे राजकारण सध्या चालले असून भाजप विरोधी पक्षासाठी सत्ता मिळवण्यासाठी कुठलेही स्तराला जाण्यास तयार असल्याचे चित्र या माध्यमातून पाहायला मिळाले एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे सत्ते मध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचे असा एक मी कार्यक्रम चालला असून वाढती महागाई भ्रष्टाचार त्यामुळे सर्वसामान्य जनता भाजपाच्या राजकारणाला कंटाळली असून काँग्रेस हा एकमेव पक्ष त्याला विरोध करत आहे त्यामुळे देशामध्ये काँग्रेसचे सरकार येण्यासाठी अनुकूल वातावरण आहे राहुल गांधी यांचे नेतृत्व सर्वांना भावले असुन महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धव साहेब ठाकरे शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेऊन येणाऱ्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर जागा वाटपावरून युती न झाल्यास स्वबळावर लढणार असल्याचे ‍करमाळा तालुका काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव नामदेवराव जगताप यांनी सांगितले आहे. ‍यावेळी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख  तालुका उपाध्यक्ष छगन मोहोळकर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष संभाजी शिंदे अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष जावेदभाई शेख तालुका उपाध्यक्ष दादासाहेब कुदळे ओबीसी तालुका संघटक भगवानराव डोंबाळे  काँग्रेस आय अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण तालुका उपाध्यक्ष अशोक घरबुडे काँग्रेस आय शहराध्यक्ष सुजय जगताप तालुका उपाध्यक्ष रमजान मुलाणी तालुका उपाध्यक्ष साहिल भाई सय्यद तालुका उपाध्यक्ष ओबीसी सेल इकबाल भाई शेख महादेव कुदळे अर्जुन मदने सुलतान शेख निलेश चव्हाण नितीन चोपडे उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group