ज्येष्ठ नागरिकांसमवेत दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस शुक्रवार दि. २१ जुलै २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सदर वाढदिवसाचे औचित्य म्हणनू श्री राणादादा यांचे निसर्गाप्रती असलेले प्रेम म्हणून त्यांच्याच संकल्पनेतून वाढदिवसाची सुरूवात संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपटयांचे वृक्षारोपण करून करण्यात आली सदर वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव सौ. माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच श्री. राणादादा यांना ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेला आदर, प्रेम, आत्मीयता तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना समाजाकडून दुर्लक्षित करण्यात आलेले आहे अशा ज्येष्ठ नागरिकांचा आशिर्वाद व प्रेम मिळावे म्हणून तांदुळवाडी, ता. बारामती येथील बारामती ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धाश्रमाला २३० लिटरचा रेफ्रिजरेटर भेट म्हणून देण्यात आला तसेच तेथे उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या फळांचे वाटप करण्यात आले. वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. सर्व ज्येष्ठ नागरिगांनी अशाप्रकारे वाढदिवस साजरा करण्यात आला म्हणून श्री. राणदादांना खुप आशिर्वाद व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील प्रतिनिधी म्हणून श्री. रियाज शेख, कु. सोनाली बेलदार, प्रा. वैशाली भागवत, प्रा . प्रतिक्षा पाटील, श्री. श्रीकांत पाटील, कु. श्रद्धा जगताप व वृद्धाश्रमातील पदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
