कुगाव ते शिरसोडी पुलानंतर उजनीवरचा सर्वात कमी अंतरातील पोमलवाडी ते चांडगाव पुल भविष्यकाळात करण्याचे नामदार. अजितदादा पवार यांचेकडून सुतोवाच
करमाळा प्रतिनिधी- आज करमाळा तालुक्याच्या आणि इंदापुर तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा व जवळपास १३३२ मीटर लांबीचा सेतु ( पुल) कुगाव ता करमाळा ते शिरसोडी ता इंदापुर दरम्यान चा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते व माजी मंत्री दत्तात्रय भरणे मामा व आमदार संजयमामा शिंदे , यांचे उपस्थितीत होत असुन, या पुलाचे काम झाल्यावर उजनी धरणावरील हा सर्वात मोठा पुल साकारला जाणार असुन, पश्चिम भागातील डिकसळ ते कोंढार चिंचोली पुलाचे कामही प्रगती पथावर आहे. तर उजनीवर सर्वात कमी अंतराचा(७३५ मीटर) व संपादनाची कोणतीच आवश्यकता नसणारा दोन्ही बाजुला ॲप्रोच रस्ते असणारा चांडगाव ते पोमलवाडी हा पुल साकारण्याकरीता वरीष्ठ स्तरावरून हालचाली चालु असुन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी याबाबतची घोषणाही अनेक कार्यक्रमातुन केलेली आहे. सदरच्या ठिकाणी सर्वात जास्त लाँचेस दिवसभर चालतात. या ठिकाणचे वहातुकीचा विचार करता या ठिकाणी पुल होणे अत्यंत गरजेचे आहे. या पुलामुळे मध्य रेल्वेचे पारेवाडी रेल्वे स्थानक व एन एच ६५ लोणी देवकर मधील अंतर ७ किमी वर येणार आहे. तर केत्तुर- पारेवाडी- राजुरी-कोर्टी ते राशीन व करमाळा रस्त्याला महत्व प्राप्त होणार आहे , शिवाय हिंगणी – देलवडी- कुंभारगाव मार्गे राशीन चे अंतर जवळ येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाचे पुरवणी बजेटमधे देखिल हे काम आमदार संजयमामा शिंदे , आमदार दत्तामामा भरणे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सुचविलेले होते त्याचा पाठपुरावा होत असुन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब म्हणजे दिलेला शब्द पाळणारा आणि जे ठरवलयं ते करणारा माणुस असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा माढा मतदार संघाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी दिली असुन.. आज होणाऱ्या कुगाव ते शिरसोडीच्या कार्यक्रमास व होणाऱ्या नविन पुलाचे कामी शुभकामना व्यक्त केलेल्या आहेत.
