दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा यावर्षीचा दहावीचा निकाल 100 टक्के
करमाळा प्रतिनिधी १३ वर्ष यशाची परंपरा कायम दौंड तालुक्यातील नामांकित दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा यावर्षीचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून 13 वर्षापासूनची ही परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.
पूर्वा प्रशांश साळुंखे या विद्यार्थिनीने 95.00 टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. द्वितीय क्रमांक ऋषी राज संतोष राक्षे याने 92 .00 टक्के मिळवलेआहेत.तृतीय क्रमांक वैष्णवी गजानन गुणवरे हिने 91.80 मिळवले आहेत.यशस्वी सर्व विद्यार्थी ,शिक्षक व प्राचार्या सिंधू यादव मॅडम ,प्रा.विभाग प्रमुख प्रा.धर्मेंद्र धेंडे ,वर्गशिक्षिका संगीता खाडे यांचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर, सचिव प्रा. झोळ मॅडम , प्रशासकीय अधिकारी विशाल बाबर सर,संचालिका प्राचार्या नंदा ताटे मॅडम यांनी अभिनंदन केले.
